अमृतसरमध्ये व्यापारपेठा बंद   

पहलगाम हल्ल्याचा निषेध 

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर येथे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. त्या अंतर्गत शनिवारी व्यापारपेठा बंद ठेवण्यात आल्या. या वेळी मोर्चा काढून हल्ल्याचा निषेध केला. बाजारपेठ ते जुन्या शहरातील भींतीपर्यंत काढलेल्या मोर्चात व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  
 
अमृतसर व्यापारी संघ आणि अन्य संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.११ खासगी शाळा देखील बंद ठेवल्या होत्या. पेट्रोल पंप, भाजीपाला आणि दुग्ध व्यावसायिक, औषध आणि अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आले होते. राज्य परिवहन आणि रेल्वसेवा पूर्ववत सुरू होती. बंदमुळे स्थानिक बससेवेची गती मंदावली होती. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पंजाबमधील विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळून पहलगाम हल्ल्याचा निषेध स्वयंपुर्तीने केला. त्यात नागरिक, व्यापारी, शाळा यांनी भाग घेतला होता. 

Related Articles